Ad will apear here
Next
‘पानिपत’मध्ये घुमला कराडच्या तुतारीचा आवाज
युवकांनी जपली आहे तुतारीवादनाची कला

कराड :  मराठी वीरांच्या अफाट शौर्याची कहाणी सांगणारा पानिपत चित्रपट पाहताना, त्यात वाजणारी तुतारी अंगावर रोमांच उभे करते. ही तुतारी कोणी वाजवली आहे माहित आहे का? ही तुतारी वाजवली आहे कराडमधल्या तरुणांनी. कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली ही मराठी मातीतली लोककला इथल्या काही युवकांनी जपली आहे. त्यामुळे आज बॉलिवूडमध्येच नव्हे, तर सातासमुद्रापार तुतारीचा नाद पोहोचला आहे.  

कराड तालुक्यातील कार्वे येथील कृष्णात गुरव व विरवडे येथील गजानन गुरव, उंडाळे येथील रत्नदीप गुरव यांनी पुढाकार घेऊन सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुरव समाजातील युवकांना एकत्र करून शिवकालीन लोककला तुतारीवादन हा ५० ते ६० युवकांचा समूह  तयार केला आहे. विविध कार्यक्रमांमधून हे तुतारीवादक ही पारंपरिक कला सादर करतात. 

या ग्रुपच्या पांडुरंग गुरव, कृष्णात गुरव, गजानन गुरव व हरिश्चंपद्र गुरव या कलाकारांना पानिपत चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटात तुतारी वाजवण्याची संधी दिली. 

२०१७मध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही ही तुतारी घुमली आहे. हा आवाज चित्रपट संगीतकार अजय-अतुल यांच्या कानी पडला व त्यांनी तुतारीवादक पांडुरंग गुरव यांना पानिपत चित्रपटासाठी तुतारीवादन करण्याबाबत  विचारले. गुरव यांनी या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला. सहा महिन्यांपूर्वी या तुतारीवादनाचा कार्यक्रम पुण्यात संपन्न झाला.

आज पानिपत चित्रपट धडाकेबाज यश संपादन करत असून, या चित्रपटात कराडच्या गुरव समाजाने दिलेली तुतारीची धून ही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली आहे. याचा अभिमान कराड तालुक्यातील सर्व समाजाला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZNTCH
Similar Posts
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘फर्स्ट टेक’ स्पर्धेत पुण्याचे चारुदत्त पांडे विजेते अहमदाबाद : ‘फर्स्ट टेक’ या राष्ट्रीय पातळीवरील पेंटिंग, प्रिंट्स, सिरॅमिक व शिल्पकला क्षेत्रातील स्पर्धेत पुण्याच्या चारुदत्त पांडे यांनी पहिल्या दहा विजेत्यांमध्ये स्थान पटकावले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंदाजे दोन हजार ३५० कलाकृतींपैकी १३० कलाकृतींची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली आणि त्यातून
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language